श्रीबुधभूषणमध्ये संभाजी महाराज लिहितात..."देवदानवक्रूत स्तुतिभागं हेलया विजित दर्पितनागम्
भक्तविघ्नहनने ध्रूतर(य़),तं नमामि भवबालकरत्नम्
ब्रिगेडवाल्यांचे हे मराठी भाषांतर पहा....
गर्वोन्नत हत्तींना सहजरीतीने जिंकून देवदानवांच्या (सर्व लोकांच्या)स्तुस्तीस पात्र ठरलेले,भक्तांच्या विघ्नांचे हनन करणार्या व रत्न धारण करणार्या रुप श्रीशिवशंकराच्या बालकरत्नास(पुत्रास-गणरायास)मी नमन करतो.ते देवदानवांनी प्रशंसा केलेले व भक्तदुःख नाशक यत्न करणारे आहेत.
________________________________________
_______________
संभाजी महाराज हे श्रीगणेशाचे निःसिम भक्त होते हे त्यांनीच लिहिले आहे ,आणि ब्रिगेडवाल्यानीहि त्यांच्या अनुवादात लिहिले आहे.मग संभाजी महाराजांचे नांव घेणार्या ब्रिगेडवाल्याना श्रीगणेशाचा द्वेष का?म्हणे श्रीगणेश ब्राह्मणांचा देव?(काय काय शोध लावतील हे तेच जाणे)आहो महा पंडित मग ब्राह्मणांच्या देवाचे संभाजी महाराज निःसिम भक्त कसे?त्यांच्या श्रध्धास्थानाना धक्का लावता...मग त्यांचे नाव घ्यायला तुम्हाला लाज कशी वाटत नाही.
--------(साभार)SubhashKhadakban