1. हिंदुत्वाला शिव्या-शाप देणारे शिवधर्माचे संस्थापक खेडेकर आणि त्यांच्या शिव्या-शापाला मंचावर बसूनच टाळ्या वाजविणाऱ्या रेखाताई खेडेकर हिंदुत्ववादी भाजपाच्या आमदार झाल्या होत्या.
2. राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले हिंदुत्वद्रोही हिंदुकडे कानाडोळा करतात हे माहीत असल्यामुळे सोलापुरातील शिवस्मारकात दादोजी कोंडदेव यांचे शिल्प यांनी फोडले (अंदाज चुकल्याने त्याचा प्रसादही मिळाला.) परंतु सोलापूर मध्यवर्ती बॅंकेच्या दर्शनी भागात मोठ ेदादोजी कोंडदेवांचे शिल्प असूनही शिवधर्मवाले तिथे वर मान करून पाहत नाहीत. मान वर केल्यास अकलूजकरांकडून मान मुरगाळण्याची भीती त्यांना वाटते. यांचा दादोजीद्वेष सोयीचा आहे, म्हणून हे ढोंगी आहेत.
3. अफजलखानाच्या वधाचे चित्र खटकते म्हणून शिवधर्मवाले या चित्राला ते विरोध करतात, ढोंगीपणाचा हा आदर्श नमुनाच होय.4. गणेशोत्सव साजरा करण्याला शिवधर्मवाल्यांचा विरोध आहे. का तर म्हणजे गणपती हा बामणांचा देव आहे. भगवान शिव हा भारतीयांचा मूळ देव आहे, असे काही शिवधर्मवाल्यांचे म्हणणे असते. ब्राह्मण नसलेल्या शिवाचा मुलगा गणपती ब्राह्मण कसा, हा प्रश्न या शिवधर्मवाल्यांना का पडत नसेल ?
5. शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी असे नाव ठेवणाऱ्या, शिवरायांना बालपणात रामायण-महाभारताच्या पराक्रमकथा सांगणाऱ्या जिजामाता नास्तीक होत्या, अशी लोणकढी थापही शिवधर्मवाली मंडळी देतात.
6. संत तुकाराम महाराजांचे शिवधर्मवाले सदैव गुणगाण करीत असतात. परंतु याचवेळी तुकाराम महाराज हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते हे विसरतात. तुकोबारायांनी नामाचा महिमा सांगितला आहे, हे ते सोयीस्करपणे विसरतात. पंढरी कोट्यवधी वारकरी जातात. आषाढी यात्रेला विरोध करण्याचे धाडस नाही, म्हणून ते वारीला विरोध करीत नाहीत. परंतु वारकऱ्यांमध्येही संतांच्या जातीवर जाऊन दुफळी माजविण्याचा अयशस्वी प्रयत्न मात्र यांनी करून पाहिला आहे.
7. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे बहुतांश पदाधिकारी हे दरवर्षी गणेशोत्सव मंडळांचेही पदाधिकारी असतात. असो.
मराठा समाजाच्या हितासाठी आम्ही काम करतो असे भासवून शिवधर्मवाली मंडळी समाजात स्थान मिळवतात हे खरे आहे. परंतु हिंदू धर्माच्या विरोधातली विचारधारा मात्र मराठा समाज तर सोडाच पण या संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडमध्ये काम करणाऱ्यांना मान्य नाही, हे त्यांच्या आचरणातून दिसून येते. मराठा समाजातील गरीबी, दारिद्य्र दूर करण्यासाठी काम करण्याची खूपच आवश्यकता आहे, हे कोणीही नाकारत नाही. परंतु यासाठी हिंदू धर्म नाकारण्याची काहीही आवश्यकता नाही.
काहीही विधायक कार्य न करता सतत केवळ विद्वेष पसरविल्याने काहीही साध्य होणार नाही हे सांगायला कोणा भविष्यवेत्याची गरज नाही. मात्र नुकतेच तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मराठा तरुणांच्या मनात हिंदूद्वेषाचे (आत्मद्वेषाचे) विष भिनविण्याचा प्रयत्न होत आहे, हे गंभीर आहे. समाजाला मागे खेचणारे आहे.
शिवधर्माचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्यांना वाटते की आपण समाजात सुधारणा घडवून आणत आहोत। या ठिकाणी मला स्वामी विवेकानंदांच्या उद्धरणांची आठवण होते.
- (साभार )
सिद्धाराम भै. पाटीलस्वामी विवेकानंद म्हणतात, "" हिंदुराष्ट्राचे पुनरुत्थान करण्यासाठी या राष्ट्राचा धर्म आमूलाग्र बदलला पाहिजे, नव्हे मोडून टाकला पाहिजे अशा विचारांचे काही सुधारक आज आपल्यात आहेत. त्यांच्यापैकी काही खरोखर विचारवंत आहेत. पण बहुतेक लोक आंधळेपणाने पाश्चात्यांचे अनुकरण करणारे आहेत, मूर्खपणाने वागणारेही आहेत. त्याना आपण काय करतो आहोत तेही कळत नाही...
खरोखर हिंदुस्थानात सुधारकांची कधी वाण होती काय? हिंदुस्थानचा इतिहास तुम्ही वाचला आहे काय? रामानुज कोण होते? चैतन्य महाप्रभू कोण होते? कबीर आणि दादू कोण होते? हे सारे जण महान सुधारकच नव्हते काय?
रामानुजांच्या पोटी दलितांविषयीचा उत्कट जिव्हाळा नव्हता काय? आपल्या संप्रदायात भंग्यांपर्यंत सर्वांना प्रवेश असावा यासाठी ते शेवटपर्यंत झगडले नाहीत काय? अगदी मुसलमानांनीसुद्धा आपल्या उपासना पंथात यावे म्हणून ते झटले नाहीत काय? नानकांनी हिंदू आणि मुसलमान या दोघांनाही दीक्षा देऊन एक नवा पायंडा पाडला नाही काय? हे सर्व सुधारक होते। त्यांचे कार्य अद्यापही चालूच आहे. आत्ताच्या आणि त्यावेळच्या सुधारकांमध्ये फरक एवढाच की, आताच्या सुधारकांसारखा गाजावाजा त्या वेळच्या सुधारकांनी केला नाही. त्यांच्या ओठी कुणासाठी शिव्याशाप नव्हते- केवळ शुभतम आशीर्वादच होते!''