Friday, October 26, 2012

ब्राम्हणद्वेशाची पाळेमुळे


सध्या बाजारामध्ये अनेक संघटना, पक्ष, चळवळी केवळ एका आधारावर उभ्या आहेत तो म्हणजे ब्राम्हणद्वेष !  ब्राम्हणद्वेष पसरवायचा आणि  आपले वैयक्तीक, पाक्षीक किंवा सांघटनीक स्वार्थ साधुन घ्यायचा असा एक ट्रेड चालू आहे. देशासमोर आ वासुन उभे असलेल्या समस्यांना, प्रश्नांना , अडचणींना बदल देवुन कोणी एके काळी ब्राम्हण समाजाने आमुक आमुक या समाजावर काहीतरी तमुक तमुक अन्याय केले हे जिवाच्या आकांताने ओरडून ओरडून सांगायचे (ओरडायचे कारण म्हणजे तो मुद्दा देशाच्या इतर प्रश्नांपेक्षा महत्वाचा वाटायला हवा यासाठी) आणि समोर बसलेल्या ठरावीक एका सामाजीक वर्गाला ज्याच्याकडे इतरांच्या तुलनेत बौद्धीक विचारक्षमता कमी आहे त्यांच्यापुढे वाघ म्हणुन मांजराला पुढे करायचे , जेणेकरुन जो खरा वाघ आहे त्याच्याकडे लोकांचे दुर्लक्ष होईल. कसे का ? कारण म्हणजे या खर्‍या वाघाचे आणि जिवाच्या आकांताने ओरडणार्‍यांचे साटेलोटे आहे हे सांगण्यासाठी काही मोठ्या तत्वज्ञाची गरज नाही.
थोडक्यात ब्राम्हणद्वेशावर या लोकांचे पोटपाणी चालू आहे. या ब्राम्हणद्वेशाची पाळेमुळे खनुन काढल्याशिवाय या तथाकथित ब्राम्हणद्वेशी लोकांचा स्वार्थ आणि यांचे खरे जावाई आणि घरजावाई कोण हे लक्षात येणार नाही .
भारतावरील ७११ साली पहिले इस्लामी आक्रमण झाले, त्यानंतर तब्बल ३०० वर्ष हिंदु योध्यांनी ही आक्रमणे थोपवुन धरली , त्यानंतर मात्र हिंदु प्रतिकार शिथिल होवून इस्लामी आक्रमणे तिव्र होवू लागले त्यापासुन पुढे साधारण ६०० वर्षे हिंदुस्थानामध्ये इस्लामी टोळधाडी, आक्रमणे, लुटालूट, हिंसाचार यांची पराकाष्ठा झाली, यामध्ये हिंदुस्थानातील हिंदुंचा स्वधर्माप्रती असलेला स्वाभिमान इस्लामी आक्रमाकांनी रसातळाला नेला, त्याचबरोबर अनेक वैदीक ग्रंथ व पुस्तके , अनेक ऐतिहासीक साधने नष्ट केली. त्यानंतर शिवरायांचा जन्म झाला व हिंदुस्थान इस्लाममय होण्यापासुन  वाचला. त्यानंतर इंग्रज आले , त्यावेळी वैदीक ग्रंथ , पुस्तके , साहित्य आणि ऐतिहासीक दस्तैवज विखुरलेले होते इंग्रजांनी हिंदुंचे हे विखुरलेले वैदीक साहीत्याचे आधुनिक पद्धतीने एकत्रिकरण करण्याचे ठरवले. आणि ते ही असे की जसे इंग्रजांना या देशावर राज्य करण्यासाठी सोईस्कर ठरेल अशा पद्धतीने आणि याच वैदीक साहित्याचे आधुनिकिकरण करताना इंग्रजांनी त्यामध्ये स्वत:च्या सोईनुसार भेसळ केली ज्याचा उपयोग इंग्रजांना त्यांच्या फोडा-झोडा आणि राज्य करा अशाप्रकारच्या राजकारणाला पुरेपूर झाला. त्यानी या वैदीक साहित्यामध्ये अशाप्रकारे भेसळ केली की ज्याद्वारे हिंदुंच्या मनात शंका निर्माण होतील. वस्तुत: इतिहास हा असा विषय आहे की तो कोणत्याही देश किंवा समाजाच्या विविध परंपरा तसेच मान्यता तसेच महापुरुशांच्या गौरवगाथा आणि संघर्षाच्या सामुहिक आढावा होय, ज्याचा उद्द्देश त्या देश अथवा समाजाची भावि पिढी त्यापासुन प्रेरणा घेवु शकेल. परंतु भारताचा इतिहास आज ज्या स्थितित आहे आहे त्या दृष्टीकोणातुन विचार केला असता निराशाच आति पडते. असो. तर इंग्रजांनी विस्कळीत अशा वैदिक ग्रंथांचे एकत्रिकरण आणि आधुनिकिकरण करत असताना त्यामध्ये अशाप्रकारच्या विकृती आणि फेरबदल केले की ज्यातुन पुढे सामाजीक कलहच निर्माण होईल जो इंग्रजांना राज्य करण्यासाठी आवश्यक होता. आणि या विकृती आणि फेरबदलाचा सरात मोठा उद्देश हा होता की भारतियांना त्यांच्या संस्कृती, महापुरुष आणि विद्वानांबद्दल घृणाच निर्माण व्हावी. कंपनी सरकार ने आपल्या उद्देशाच्या प्राप्ती साठी अशाप्रकारे बहुमुखी योजना बनवली या योजनेच्या अंतर्गत पाश्चात्य विचारवंत आणि वैज्ञानिकांनी, इतिहासकारांनी आणि शिक्षण-शास्त्रज्ञांनी, लेखक आणि अनुवादकारांनी, इंग्रज प्रशासक आणि ख्रिस्ती मिशनरी धर्मप्रसारकांनी भारताची प्राचिनता, व्यापकता, अविच्छिन्नता आणि एकात्मतेलाच नाही तर समाजातील "ब्राम्हण" म्हणजे विद्वानांच्या महत्वतेला आणि प्रतिष्ठेला नष्ट करण्याच्या उद्देशाने एकत्रीत असे अभियान चालवले. आणि याच अभियानाच्या अंतर्गत  असा प्रचार करण्यात आला भारतीय सभ्यता ही प्राचीन सभ्यता नाही, रामायण - महाभारत वगैरे घटना केवळ कल्पित आहेत वगैरे वगैरे आणि सत्तेत असल्यामुळे त्यांना या गोष्टीचा उचित लाभ मिळाला. आणि येथुनच सुरवात झाली ब्राम्हणद्वेशाची , त्या काळी ’इंग्रजांनी’ भारतीयांमध्ये वर सांगीतल्याप्रमाणे  समाजातील "ब्राम्हण" म्हणजे विद्वानांच्या महत्वतेला आणि प्रतिष्ठेला नष्ट करण्याच्या उद्देशाने एकत्रीत असे अभियान चालवले आजही विद्रोही तेच करत आहेत. या इंग्रजांच्या ब्राम्हणविरोधाबद्दल मोनियर विल्यम्स नावा्चा इंग्रज आपल्या "मॉडर्न इंडीया एण्ड दी इंडीयन्स" या पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीच्या पृष्ठ २६१ वर म्हणतो, "When the walls of the mighty fortrees of Brahmanism are encircled, undermined and finally stormed by the soldiers of the cross, the victory of christiannity must be signal and complete" म्हणजे "जेव्हा ब्राम्हणांची शक्तीशाली दुर्ग (मंदीरे) ख्रिस्ती सैनिकांद्वारे घेरली जातील, दुर्बल बनवली जातील आणि नष्ट केली जातील तेव्हाच ख्रिस्तिकरणाच्या पुर्ण विजयाचा संकेत मिळेल".
दुर्दैवाने इंग्रजांच्या नंतर तेच काम विद्रोह्यांच्या मार्फत अव्याहतपणे चालू आहे. आता या विद्रोह्यांना  कारण नसताना प्रतिसाद मिळणे कठीन आहे म्हणुन यांनी आता शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, छ. संभाजी महाराज इत्यादी महापुरुषांच्या नावाने त्यांचे विरोधक असलेल्या आणि भारताला १५० वर्षे गुलाम करुन ठेवलेल्या इंग्रजांचे हेच मिशनरी काम पुढे चालवत आहेत. आणि याचेच सबळ उदाहरण म्हणजे आर्य-अनार्य वाद जो इंग्रजांनी स्वत:च्या सोईसाठी बनवला होता , आज याच बादाचा उपयोग हे विद्रोही जनतेची माथि भडकवायला आणि स्वत:चा स्वार्थ साधुन घ्यायला करत आहेत.

No comments:

Post a Comment