Monday, June 29, 2009

होय, दादाजी कोंडदेव हे शिवाजी महाराज यांचे राजकीय गुरु होते

स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रांमधील उल्लेख, इतर समकालीन व उत्तरकालीन कागदपत्रे आणि बखरी या सर्व प्रकारच्या साधनांमधून दादाजी कोंडदेव यांच्या कामगिरीचे एक सुसंगत चित्र आपल्यापुढे उभे राहते. सुमारे शंभर वर्षांपूर्वीचे इतिहासकार
श्री. कृष्णराव केळूसकर यांच्यापासून ते सध्याचे नामवंत इतिहासकार प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांच्यापर्यंत अनेक विद्वान इतिहासकारांनी दादाजी कोंडदेव यांच्या कार्याचे वर्णनही केले आहे.
पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याची नोंद ज्या एकमेव सहा कलमी शकावलीत आहे, त्या नोंदीतदेखील दादाजी यांचा स्पष्ट उल्लेख आहे. असे असतांना सत्तेच्या राजकारणाने अंध झालेले काँग्रेस शासन मूठभर मराठी संघटनांच्या दबावाला बळी पडून इतिहासातून दादाजी कोंडदेव यांचे नाव पुसण्याचा प्रयत्‍न करत आहे. याची सुरुवात दादोजी कोंडदेव क्रीडा पुरस्काराचे नाव बदलून झाली. तेवढ्याने समाधान न झालेल्या या ब्राह्मणद्वेष्ट्या मंडळींनी शिवस्मारक समितीत शासनाने निवडलेले शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाला विरोध केला. या वर्षी नव्याने प्रकाशित झालेल्या इयत्ता ४ थीच्या इतिहासाच्या पुस्तकातून शासनाने दादाजी कोंडदेव यांनी शिवरायांना शिक्षण दिल्याचा उल्लेख वगळून खरा इतिहास विद्यार्थ्यांपासून लपवण्याचे पाप केले. शहाजीराजे यांच्या अतिशय विश्‍वासू लोकांमध्ये दादाजी कोंडदेव यांचा उल्लेख इतिहासात आढळतो. लेखामध्ये दादाजी कोंडदेव यांच्या व्यक्‍तीत्वातील विविध पैलंूबद्दल या लेखात माहिती देत आहोत. दादाजी कोंडदेव हे शिवाजी महाराज यांचे राजकीय गुरु होते, याबद्दल पुरावे सांगणारी माहिती उद्याच्या अंकात प्रसिद्ध होणार्‍या उत्तरार्धात वाचा. (

शाहजी महाराजांकडून पुणे परगण्याच्या देखरेखीसाठी दादाजी कोंडदेव यांची नियुक्‍ती
आदिलशाहीने वैराण केलेल्या पुणे परगण्याची पुन्हा भरभराट करण्याकरता शाहजी महाराजांनी दादाजी कोंडदेव यांची नेमणूक केलेली होती. पुणे परगणा व त्याच्या आसपासचा जो मुलूख शाहजी महाराजांकडे जहागीर म्हणून होता, त्याचा कारभार शाहजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार या नात्याने दादाजी कोंडदेव पाहात असे. दादाजी कोंडदेव यांचा जुन्यातला जुना उल्लेख इ.स. १६३३ मधील एका पत्रात आला आहे. पुणे परगण्यातील महमदवाडी या गावासंबंधी हे पत्र आहे. त्यात त्या गावचा पाटील जाऊ पाटील याने लिहून दिले आहे की :
`बापूजी देऊ पाटील घुले हा आपला भाऊ दुष्काळ पडला म्हणून गाव सोडून परमुलुखाला गेला. त्यावर वडील तो मेले. आम्ही वाचलो. सुकाळ झाला. यावर दादाजी कोंडदेव सुभेदार दिवाण झाले. त्यांनी मुलूख लावला. देशमुख, देशकुलकर्णी यांना ताकीद केली की, ``हा गाव पडला, पाटील आणऊन गाव लावणे.'' मग आपणास नेऊन कौल (म्हणजे अभय, आश्‍वासन) देऊन गाव लावला. (संदर्भ : शिवचरित्रसाहित्य, खंड २, लेखांक ९५.) याच प्रकरणी, याच तारखेचा व याच आशयाचा, एक कागद गोताच्या साक्षीने करण्यात आला. त्यातही ``राजश्री दादाजी कोंडदेव सुभेदार येऊन गावाची गाव लाविला'' (म्हणजे ओसाड पडलेली गावे परत वस्ती करवून भरभराटीस आणली) असा उल्लेख आहे. (संदर्भ : शिवचरित्रसाहित्य, खंड २, लेखांक ९६.)

इतिहासातील दाखल्यांकडे दुर्लक्ष करून दादाजी कोंडदेव व जिजाऊबाई यांच्या संबंधांवर अश्लील लिखाण करणारे जेम्स लेन !
शाहजी महाराज आणि मातुश्री जिजाबाई यांच्याविषयी दादाजी कोंडदेव यांची काय भावना होती ? छत्रपती शाहू महाराजांनी शिरवळ परगण्याच्या देशकुलकर्णीविषयीच्या एका तंट्याचा निवाडा करून त्या परगण्याचा देशपांडे म्हणजेच देशकुलकर्णी, यादो गंगाधर, याला दिलेले १ ऑक्टोबर १७२८ या तारखेचे एक अस्सल वतनपत्र उपलब्ध आहे. (संदर्भ : ३. शिवचरित्रसाहित्य, खंड १, लेखांक ८२ (पृ. ९३ ते ९७) पुरावा म्हणून जी कागदपत्रे शाहू महाराज यांच्यासमोर त्या प्रकरणी दाखल करण्यात आली, त्यात दादाजी कोंडदेव यांनी शिरवळ परगण्याच्या हवालदाराला पाठविलेले २ एप्रिल १६४६ या तारखेचे एक अस्सल पत्र होते. ते पत्र छत्रपती शाहू महाराजांनी ग्राह्य मानले आहे आणि वर नमूद केलेल्या त्यांच्या वचनपत्रात उद्धृतही केले आहे. दादाजी कोंडदेव यांच्या त्या पत्रात जिजाबाई साहेबांचा उल्लेख `सौभाग्यवती मातुश्री जिजाआऊ साहेब' असा आला आहे. (४. शिवचरित्रसाहित्य, खंड १, लेखांक ८२ (पृ. ९६) राजमाता जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराज आणि दादाजी कोंडदेव यांच्याविषयी खोटा, गलिच्छ व हलकट मजकूर लिहिणारा जेम्स लेन आणि त्या हलकट मजकुराचा प्रचार व प्रसार करणारी मंडळी यांना दादाजी यांच्या पत्रातला हा `मातुश्री जिजाआऊ साहेबांचा' उल्लेख हे चोख उत्तर नाही का ?

दादाजी कोंडदेव यांच्या विविध कामगिरींबद्दल ऐतिहासिक पुरावे !
शाहजी महराजांच्या नोकरीत सुभेदार म्हणून काम करत असतांना दादाजी यांना वतनासंबंधीच्या निरनिराळया तंट्यांचे निवाडे करावे लागले. गोतसभेत दादाजी यांच्या उपस्थितीत झालेल्या अशा निदान नऊ निवाड्यांची कागदपत्रे उपलब्ध आहेत. (मराठ्यांच्या इतिहासाची साधने) दादाजी कोंडदेव यांनी उजाड झालेला मुलूख पुन्हा लागवडीखाली आणला, अशा आशयाचा उल्लेख अनेक कागदपत्रांमध्ये व बखरींमध्ये आलेला आहे. (उदा. शिवचरित्रसाहित्य, खंड २, मराठ्याच्या इतिहासांची साधने, ऐतिहासिक संकिर्ण-साहित्य, इत्यादी) पुणे परगण्यातील बाणेर (सध्याचे बाणेर) या गावी दादाजी कोंडदेव यांनी पिण्याच्या पाण्याकरता पाट बांधून आणल्याचा उल्लेख एका पत्रात आला आहे. (पेशवे दप्‍तरातून निवडलेले कागद, खंड ११, लेखांक ६५). पुण्यातून वाहणार्‍या आंबील ओढ्याला दादाजी कोंडदेवाने धरण बांधल्याचा उल्लेखही एका जुन्या कागदात आहे. (पुणे नगर संशोधन वृत्त, खंड १, टाचण क्र. ४८).

15 comments:

 1. Jai Bhavani! Jay Shivaji!

  ReplyDelete
 2. harmkhor james lane...
  jai bhavani
  jai shivaji
  jai maharashtra

  ReplyDelete
 3. EAK BHAVANI EAK JIJAE EAK SHIVAJI EAK MAHARASTRA

  ReplyDelete
 4. dadu kondadev shivarayanche guru asalyache tumachyakade purave asatil tar maharashtr govt. ne magitale tevha ka dile nahit.

  ReplyDelete
 5. dadoji he chhatr.shahaji Raje yanche naukar hote,mujara ghlnare hote te chhat.shivaji maharaj yanche guru nahi. naukar he guru asu shakat nahi.

  ReplyDelete
 6. इतिहासातील दाखल्यांकडे दुर्लक्ष करून दादाजी कोंडदेव व जिजाऊबाई यांच्या संबंधांवर अश्लील लिखाण करणारे जेम्स लेन !
  jijau maa saheb mhanun ullekha kara
  asa murkhpana punha karu naka

  ReplyDelete
 7. जय शिवराय !
  आपण लिहिलेला लेख फार उत्तम आहे. त्यातून बरीच नविन माहिती मिळाली, धन्यवाद ! यापुढे ही असेच माहितीपूर्ण लेख आपल्याकडून वाचायला मिळतील अशी अपेक्षा आहे. "थेम्बे थेम्बे तळ साचे" ह्याच प्रमाने आपणही या लेखा द्वारे "मराठी" इतिहासासाठी मोठे योगदान देत आहात !

  जय शिवराय !
  गौरव सुभाष सकपाळ,
  राजे शिवराय विचार प्रसारक मंडल, महाराष्ट्र.
  ९१४६४४४५८८

  ReplyDelete
 8. काय तरी फालतू लेख लिहू नका कोण कुठला दादू कोंडदेव ? आणि कोण गुरु ? शिवरायांचे वडील आणि आजोबा तसेच मातृ आजोबा आणि जिजाऊ हे शास्त्र चालविण्या मध्ये निपुण होते त्यामुळे त्यांना कुठल्या भट-ब्राह्मणाची गरज नव्हती .

  ReplyDelete
 9. @अभिजीत पाटील

  दादू कोंडदेव ?
  शिवरायांच्या दरबारातील एका निष्ठावंत अधिकार्‍याबद्दल अशी भाशा वापरताना आपल्याला काहीच वाटले नाही ? नक्की आपण मराठाच आहात ना ?

  ReplyDelete
 10. हिंदुत्व एक थो्तांड

  ReplyDelete
 11. वरील लेख हा ब्राह्मणांच्या हरामखोरीचा कळस आहे . दादू कोंड देव हा जर शिवाजी महाराजांचा गुरु असता तर त्याने आत्महत्या का केली असती ? अ‍ॅड. अनंत दारवटकर.
  दादोजी कोंडदेव शाहाजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार हे वर्णन पूर्णत: खोटे व बनावट असून लेखकाची मखलाशी आहे. ‘दादोजी गोचिवडे’ आणि ‘दादोजी कोंडदेव’ हे वेगवेगळे. दादोजी गोचिवडे हा मलठणचा आहे तर दादोजी कोंडदेव शिवथरचा आहे. दादोजी कोंडदेव विजापूरकरांकडे प्रथम कारकून म्हणून नोकरी करीत होता. इ.स. १६३० मध्ये त्याची हवालदापर्यंत बढती झालेली होती. इ.स. १६३० मध्ये विजापुरी सरदार मुरार जगदेवाने पुणे कसबा वस्ती जाळली. त्याचे दायित्व आदिलशाही हवालदार म्हणून दादोजी कोंडदेवाकडे जाते. इ.स. १६३२ ते १६३६ अखेपर्यंत शाहाजीराजांच्या शत्रुपक्षाकडे दादोजी कोंडदेव नोकरी करीत होता. त्याने शिवाजीराजांचा कोकणात उतरण्याचा रस्ता बराच काळ रोखून धरून आदिलशाही खजिना भरण्याचे काम केले होते व त्याची शिक्षा महाराजांनीच त्याला दिली.

  ReplyDelete
 12. वरील लेख हा ब्राह्मणांच्या हरामखोरीचा कळस आहे . दादू कोंड देव हा जर शिवाजी महाराजांचा गुरु असता तर त्याने आत्महत्या का केली असती ? ब्राह्मणी लेखकांनी कोंड देवचे उदात्तीकरण केले. ज्या कोंड देवची शिवरायांच्या चपलेजवळ उभे राहण्याची लायकी नाही

  ReplyDelete
 13. प्रकाश पोळ कराड

  हां तर मुर्ख शिरोमणि आहेच त्यात काही वाद नाही
  पण

  सुरेश
  अभिजीत
  आणि अमित पाटिल तुम्ही सुद्धा चौथी नंतर परत कधी इतिहास वाचायचा प्रयत्न केला नसेल हे मी खात्री ने सांगू शकतो

  कारण इतिहास ज्या कादगपत्रांचा आभ्यास करुण लिहिला जातो
  ती कागड़पत्र ही इतिहास संशोधक मंडळा ने मान्य केलेले अस्सल पुरावे असतात

  आणि महाजन यानी लेख लिहितानि त्या पुराव्यांचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे
  शिवकालीन पत्र संग्रह
  संभाजी कालीन पत्र संग्रह
  शहाजी महाराजानि लिहिलेली पत्र
  किंवा दादोजी कोडदेव यानी शाहजी राजांना लिहिलेली पत्र

  ही सगळी कधी तरी तुम्ही आयुष्यात एकदा जरी वाचायचे कष्ट घेतले असते ना तर तुम्हाला लक्षात आल असत की
  स्वता शिवाजी महाराज आणि शहाजी महाराज सुद्धा दादोजी कोंडदेवांचा उल्लेख अतिशय आदराने करायचे..!!

  आणि तुम्ही फालतू लोक काय महाराजां पेक्षा पण मोठे आहात की काय..???
  जे तुम्ही दादु असा दादोजींचा उल्लेख करता..??

  तुम्ही स्वताला महाराजां पेक्षा पण मोठे समजता की काय रे...?

  आणि
  हां फालतू प्रकाश पोळ तू नक्की पोळच असला पाहिजेस कारण बैला तुला 5 पैशाची पण अक्क्ल असेल ना तर एक पत्र अस दाखव ज्यात महाराजानि दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख दादु असा केला आहे

  मग तुझी महाराजांच्या दरबारात चोपदार बनायची लायकी नसताना तू दादु असा उल्लेख कसा काय करू शकतो

  अस काय काम तू दादोजी कोंडदेव यांच्या पेक्षा मोठ केल आहेस रे बाबा

  दादोजी कोंडदेव यांचा अनादर करणार पत्र लिहिल आहे ते आदिलशहा ने मग तुम्ही पण आदिलशहा ची भाषा बोलताय दादोजी कोंडदेवाना तुम्ही बहुतेक आदिलशहा ची औलाद आहात की काय..??

  ReplyDelete


 14. खालील पत्र विजापूरच्या आदिलशहाने कान्होजी जेधे यांना लिहिले आहे. यावेळी कान्होजी जेधे हे आदिलशहाचे सरदार होते. पत्राची निश्चित तारीख उपलब्ध नाही. 
  -------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  "ज्या अर्थी शहाजी भोसले यास दरबारातून अप्रतिष्ठेने काढून लावण्यात आले आहे आणि त्याचा मुतालिक दादाजी कोंडदेव याने कोंडाण्याचे बाजूस धामधूम चालवली आहे त्या अर्थी त्यास शिक्षा करून विलायत ताब्यात घेण्यासाठी खडोजी (खंडोजी..??) व बाजी घोरपडे याची नेमणूक करण्यात आली आहे तरी तुम्ही आपल्या जमावानिशी मशारनिव्हेस (??) सामील होऊन त्याच्या संमतीने तो दुष्ट दादोजी व त्या हरमखोराचे साथीदार यांना नेस्तनाबूत करावे आणि विलायत ताब्यात आणावी जेणेकरून तुमची सरफराजी होईल.


  रवाना छ. ७ जमादिलाखर सन १०५४ पाा खास हुजूर.

  आता हे पहा आदिलशाह दादोजी कोंडदेवाना काय बोलतो आहे
  आणि आदिलशाह ची भाषा बोलणार पण बहुतेक त्याचीच औलाद असावेत

  ReplyDelete
 15. शिवधर्म-एक थोतांड,या Title ने लेख लिहीताना तुमची title वरुनच लायकी समजते.त्यानंतर पुरदंरे, कोंडदेव यांचे उदात्तिकरण करण्याची गरज नाही कारण समस्त महाराष्टाला माहित आहेत,ते कोण आहेत आणि ते काय करत होते.आम्ही खोटा इतिहास लिहिणारांची आता गय करणार नाहीत.त्याचबरोबर खोटा इतिहास पुरवठा करणारांची ही चलाखी यापुढे चालु दिली जाणार नाही.

  ReplyDelete