Wednesday, December 31, 2008

भंडारकर आणि खेडेकर(हां काय प्रकार आहे)

संभाजी ब्रिगेडनेच जानेवारी २००४ मध्ये भांडारकर संस्थेमध्ये धुडघुस घालून अतिशय दुर्मिळ संस्क्रुत ग्रंथांचा विध्वंस केला.सरस्वतीची तसबिर फोडली.सुसंस्क्रुत संभाजी महाराजांचे नांव धारण करणार्यांचा हा असंस्क्रुतपण रानटीपणा पाहुन संभाजी महाराजांचा आत्मा नक्कीच हळहळला असेल.आत्ता जर संभाजी महाराज हयात असते तर त्यांनी या धर्मद्रोह्याना हत्तीच्या पायी ठार मारण्याची शिक्षा फर्माऊन ती ताबडतोब अमलात आणली असती.

छत्रपति संभाजी महाराजांनी " बुधभूषण " हा ग्रंथ संस्क्रूतमध्ये लिहिला आहे.राजकारण धुरंधर संभाजी महाराज संस्क्रूतमध्ये ग्रंथ लिहितात यावरुनच ते सुसंस्क्रूत,उच्च शिक्षित होते हे स्पष्ट होते."बुधभूषण "हा संस्क्रूत ग्रंथ पुणे येथील भांडारकर प्राच्यविध्या संशोधन संस्थेने १९२६ साली प्रकाशित केला.भांडारकर प्राच्यविध्या संशोधन संस्थेने प्रकशित केलेल्या संस्क्रूत ग्रंथाचे संभाजी ब्रिगेडने २००७ साली मराठी अनुवाद प्रसिद्ध केला.या मराठी अनुवादाच्या प्रस्तावनेमध्ये श्री.पुरुषोत्तम खेडेकर लिहितात...."श्रीबुधभूषणचे जेव्हडे लिखाण सापडले त्याचे उत्तम वर्गीकरण करुन पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्ध्या संशोधन संस्थेने इ.स.१९२६ मध्ये ते प्रकाशित केले.प्रा.ह.दा.वेलणकर यांनी मुंबई व इतर परिसरातून तुरळक हस्तलिखिते प्राप्त केली.रॉयल एशियाटिक सोसायटीच्या ब्रिटिश लायब्ररी मुंबई येथून हा संच प्राप्त झाला. ................भांडारकर संस्थेने श्रीबुधभूषणचे एकत्रिकरण व संपादन केले.त्याच आधारे मराठी अनुवाद आपल्या सेवेस सादर करत आहोत.श्री.वेलणकर व भांडारकर संस्थेचे आभार."

3 comments:

  1. mala ase vatate ki......kuthlahi dharma, jaat, samaj ha vayeet nasato......tyatil kahi tharavik lok vayeet astat....aani vayeet lok he pratyek samajat aahet....tevha asha faltu goshtinkade aapan laksha na dilelech bare..... ashane haani aplich hoyil....

    ReplyDelete
  2. {संभाजी ब्रिगेडनेच जानेवारी २००४ मध्ये भांडारकर संस्थेमध्ये धुडघुस घालून अतिशय दुर्मिळ संस्क्रुत ग्रंथांचा विध्वंस केला.सरस्वतीची तसबिर फोडली.सुसंस्क्रुत संभाजी महाराजांचे नांव धारण करणार्यांचा हा असंस्क्रुतपण रानटीपणा पाहुन संभाजी महाराजांचा आत्मा नक्कीच हळहळला असेल.आत्ता जर संभाजी महाराज हयात असते तर त्यांनी या धर्मद्रोह्याना हत्तीच्या पायी ठार मारण्याची शिक्षा फर्माऊन ती ताबडतोब अमलात आणली असती.}

    मग शिवरायांचा अपमान करणाऱ्या नचे व शिवस्मारक ला विरोध करणार्याचे काय केले असते पूजा ?

    ReplyDelete
  3. छ्त्रपती शिवाजीराजे,जेम्स लेन आणि भांडारकर

    (श्री.संग्राम भोसले यांच्या फ़ेसबुकवरून साभार)



    छ्त्रपती शिवाजीराजे,जेम्स लेन आणि भांडारकर

    गेली ७-८ वर्षे आपल्याकडे छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जेम्स लेन या विक्रुत माणसाने केलेल्या बदनामीची चर्चा होत आहे.लेनचा निषेध करावा तेव्हढा थोडाच आहे. २५वर्षांपुर्वी लेन भांडारकर संस्थेत ८ दिवस राहीला होता, यावरुन या बदनामीच्या मागे भांडारकर संस्था आहे असा आरोप केला जातो, त्यात कितपत तथ्य आहे?
    १.भांडारकर संस्थेत प्रामुख्याने धर्मशात्रविषयक संशोधन चालते, शिवरायांचा काळ हा संस्थेचा अभ्यासविषय नाही.लेन हा ईतिहासकार नाही. त्याचे सदर पुस्तक धर्मशात्रीय शाखेतील आहे.शिवरायांच्या राज्यनिर्मितीला धर्माचा कसा उपयोग झाला यावर त्याने लिहिले आहे. त्याने केलेल्या बदनामीच्या चुकीबद्दल त्याला कठोर शिक्षा मिळायलाच हवी.
    २.मात्र साप साप म्हणून भुइच धोपटण्याचे जे काम चालू आहे, त्यामागचे राजकारणही समजून घेतले पाहीजे. एक खोटी गोष्ट १०० वेळा रेटून सांगितली की ती लोकांना ती खरी वाटू लागते या गोबेल्स नितिचा अचुक वापर करुन या प्रकरणाची मांडणी करण्यात आली आहे. शिवराय हे लोकांच्या श्रधेचा विषय आहेत, हे हेरुन हा सापळा रचण्यात आला आहे.
    ३.भांडारकर संस्थेचा या बदनामी प्रकरणाशी काडीमात्रच संबंध आहे. कारण लेन गेली २५ वर्षे महाराष्ट्रात येतोजातो, परन्तु तो २५ वर्षापुर्वी भांडारकर अतिथी ग्रुहात राहीला होता .एव्हढाच तो काडीमात्र संबंध होय.त्याला ही माहिती कोणी दिली ते शोधता आलेले नाही.त्याने ज्या १५ जणांचे आभारात उल्लेख केले त्यातील १४ जण ब्राह्मण आहेत असे सांगून, तेच या बदनामीमागे आहेत असा जोर्दार प्रचार केला गेला.खरेतर यातील अनेकजण ब्राह्मण नाहीत.डा. राजेन्द्र होरा हे जैन होते.दिलिप चित्रे सीकेपी, तर कोसंबी. वागळे. भंडारे.चंदावरकर आदि सारस्वत. यातील ६ जण वारलेले आहेत. यातील ब्राह्मणांपैकी अ.रा.कुलकर्णी, जयंत लेले, मीना चंदावरकर,{मीनाताईंचा आंतरजातीय विवाह आहे} बहुलकर अश्या अनेकांनी कायम बहुजनांच्या बाजुने उभे राहात सनातनी व्रुतीला विरोध केलेला आहे. त्यांना शत्रुच्या गोटात ढकलणे अन्यायकारक आहे,बहुजन चळवळीची रसद तोडणारे आहे.अश्याने पुढे कोणीही बहुजनांच्या बाजुने उभेच राहणार नाहीत.
    ४.वर्णवर्चस्ववादी व्रुतीला विरोध केलाच पाहीजे. जे विषमतेचे समर्थक आहेत ,लोकशाहीविरोधी असुन ब्राह्मणवादाचे पुरस्कर्ते आहेत, त्यांना आमचा विरोधच आहे,राहिल.ही एक व्रुती आहे, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या सर्वांमध्ये ती असु शकते असे डा. बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते.
    ५.आरोप करणे आणि गुन्हा सिद्ध होणे यात फ़रक असतो, हेच ज्या मंडळींना समजत नाही, किंवा समजुनच घ्यायचे नाही,ते वारंवार भांडारकर संस्थेवर आरोप करीत आहेत. तो सिद्ध करण्याचे कष्ट त्यांना नको आहेत, की तो सिदधच होवु शकत नाही याची खात्री आहे ?लेनवर हायकोर्टात आणि सुप्रिम कोर्टात खटला चालु होता तेव्हा या संघटनांनी त्यात भाग घेतला नाही,की कोणतेही पुरावे दिले नाहीत, हे फ़ार अर्थपुर्ण आहे.
    ६.या संघटनेचे एक नेते आपले पुस्तक जेम्स लेनला अर्पण करतात.
    ७.ते ब्लेकमेलिंग, हुजरेगिरी, चमचेगिरी हिच खरी चळवळ होय असे दुसर्या पुस्तकात लिहितात, हे सारे गंभीर आहे.
    ८. आतातायीपणा, कार्यकर्त्याला वेठबिगार समजणे,संशोधकांना आपले स्पर्धक बनतील या भितीने शत्रुचे हस्तक ठरविणे,हिटलरचा आदर्श माणुन चळवळ चालविणे यासार्यांमुळे लोक दूर जात आहेत.अतिरेक वाढत आहे.त्यातुन आलेले नैराश्य लपविण्यासाठी अधिकाधिक एकांगी लेखण, प्रचार चालु आहे.विवेकी लोक दोन हात दुर गेले आहेत. विनाशकले विपरीत बुध्धी......

    ReplyDelete