Saturday, October 27, 2012

विद्रोहाचा अंत इथे .

आज या देशा मध्ये, विषेशत: महाराष्ट्र आणि पंजाब जेथे देशातील लढवय्या समाज जो मराठा आणि शिख या नावानी वास करतो अशा ठिकाणी वेगवेगळ्या नावानी फुटीरतेची बिजे रोवण्याचा प्रयत्न चालू आहे. येथला ब्राम्हणद्वेशाचा मुद्दा ही त्याच बिजांचा परिणाम आहे. आज महाराष्ट्रात विद्रोही म्हणत असलेल्याप्रमाणे नेमका किती प्रमाणात ब्राम्हण्यवाद चालु आहे आणि त्यामध्ये सध्याच्या ब्राम्हणांचा किती वाटा आहे याची जाणि जाणि तथाकथीत विद्रोह्यांना असल्यामुळेच कदाचीत हे विद्रोही क्षणो -क्षणी आपल्या अनुयायांची माथि भडकवायला नेहमी विकृत इतिहासाकडे जातात. इतिहासात यांनी असे केले , इतिहासात त्यांनी तसे केले म्हणुन आज आम्हि सराकट ब्राम्हण समाजाची कत्तल करण्याची भाषा करत आहोत, हे किति बरोबर आहे याचा विचार त्यांचे अनुयायी म्हणवणारे तथाकथीत सत्यशोधक, विद्रोही ( न जाणो आनखी काही विषेषणे आहे त्यांचा उल्लेख न करणेच योग्य) हे लोक का करत नाहीत मला कळत नाही. यांच्या या ब्राम्हणद्वेशाला सुशिक्षीत समाज भिक घालत नाही. तसेच सध्या यांच्या यांच्यातच मतभेद चालू आहेत या केवळ "हिंदु" विरोधासाठी एकवटलेल्या विभिन्न विचारसणीच्या टोळ्यांमध्ये आपल्या विचारसरणीला धरुन वादविवाद (याच्याही पुढे जाऊन थेट आरोप आणि शिव्याशापही) होतात हे वेगळे सांगायची गरज नाही. विद्रोही चळवळीतील अनेक मान्यवरांना काही विद्रोही लोकांचा अति-ब्राम्हणद्वेश अजिबात मान्य नाही , तर या अतिउत्साही ब्राम्हणद्वेश करणार्‍यांना काही प्रौढ मान्यवरांचे प्रौढ विचार पचनि पडत नाहीत.  ज्या बाबासाहेबांनी हिंदु देवदेवता व संतांना रामराम ठोकुन बौद्ध स्विकारला होता , त्याच बाबासाहेबांचे नाव घेवुन हेच विद्रोही त्याच बाबासाहेबांना त्याच हिंदु साधु संतांच्या पंक्तीत बसवुन त्यांच्यासोबत बाबासाहेबांचाही जयघोष करताना दिसतात ही गोष्ट बाबासाहेबांच्या नि:सिम अनुयायांच्या पचनी पडत नाही , तर विद्रोह्यांना या लोकांचा बाबासाहेबांच्या नि:सिम अनुयायीवाद हा अति-आंबेडकरवादी वाटतो. हे विद्रोही बौद्ध धम्म आणि भगवान बुद्धांना आपले मानतात तर दुसरीकडे बौद्ध धर्म न स्विकारता स्वत:चाच असा वेगळा धर्म काढून बुद्धांच्या अनुयायांना आपल्या या नव्या धर्मात येणयासाठी आवाहन करतात आणि ही गोष्ट बौद्ध अभ्यासकांच्या पचनी पडत नाही तेव्हा ते सरळ सरळ विद्रोह्यांना व त्यांच्या अनुयायांना बौद्ध धर्मातच यायचा सल्ला देतात. पण हा सल्ला विद्रोह्यांना पेलवत नाही. इतकेच काय तर हिंदु संकृतीवर बेंबीच्या देठापासुन ताशेरे ओढणारे अनेक विद्रोही नेते हे स्वत: घरी सत्यनारायणाची पुजा घालतात, घारामध्ये हिंदु पद्धतीचे सण-उत्सव साजते करतात , आणि याच्याही पलिकडे ब्राम्हणवाद ब्राम्हणवाद म्हणुन राण उठवणार्‍यांना बायको कशी ब्राम्हण चालते हे मला आजतागायत पडलेले कोडे आहे. एकिकडे हिंदु धर्माने स्त्रियांना उंबरठ्यापलीकडे जाऊ दिले नाही म्हणुन हिंदु धर्माला शिव्या शाप द्यायच्या त्याच स्त्रियांची आजची परिस्थिति काय आहे आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचे आजपर्यंत या लोकांनी काय प्रयत्न केले याची माहीती मला आजपर्यंत एकाही विद्रोह्यांनी दिलि नाहि, कदाचीत स्त्रिला हजार सालापुर्वी ज्यांनी कोंडून ठेवले त्यांच्या नावाने बोंबा मारल्या की आजच्या स्त्रियांच्या समस्या सुटतील असा यांचा समज असावा बहुतेक. याच्याही पलिकडे जाऊन हे हिंदु धर्माला शिव्या देत देत ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माचे गोडवेही गाऊ लागले आहेत, आणि ते ही चक्क बाबासाहेबांचे नाव घेवुन . ज्या बाबासाहेबांनी आपल्या थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तकातुन ओरडून ओरडून सांगीतले की "मुसलमानांचे बंधुत्व हे सर्व मनुष्यांकरिता नसुन ते फक्त मुस्लिमांपुरते मर्यादीत आहे. जे मुस्लिम संघाच्या बाहेर आहेत त्यांच्याकरीता घृणा व शत्रुता याच्याविना काही नाही" किती विरोधाभास हा ? आंबेडकरांची इतर पुस्तके स्वत:च्या रसभरीत अनुवादासहीत प्रकाशित करुन मोफत वाटणारे त्यांच आंबेडकरांनी लिहिलेले थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तका बद्दल ब्र ही काढत नाही याचे कारण काय बरे असावे ? शेवटी केवळ हिंदु द्वेश या एका समिकरणातुन एकत्र आलेले हे अभद्र एकत्रिकरण आता स्वत:मधेच असलेल्या अंतर्गत वादातुन नष्ट होईल यात शंका वाटत नाही. 

No comments:

Post a Comment